Dahiphale Hospital

Our

Social Cause

सेवा व समर्पण अभियाना अंतर्गत टाकळखुपा येथे भाजपा वैद्यकीय आघाडी यांच्या सौजन्याने महाआरोग्य शिबिर संपन्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा व समर्पण अभियान द्वारे भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश यांच्या सौजन्याने प्रदेश संयोजक डॉ अजित गोपछडे यांच्या मार्गदर्शनाखाली टाकळखोपा ता मंठा जिल्हा जालना येथे आयोजित महाआरोग्य शिबिरास ३५० रुग्णांची मोफत तपासणी व औषधीचे वाटप करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन मा विनोद दादा वाघ भाजपा प्रदेश प्रवक्ते तथा प्रदेश उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा, मराठवाडा व विदर्भातील प्रथम महिला प्लास्टिक सर्जन डॉ उज्वला दहीफळे कराड प्रदेश सन्मयक राष्ट्रीय स्वास्थ अभियान तथा मराठवाडा संयोजक भाजपा भटक्या विमुक्त महीला आघाडी व डॉ स्वप्नील मंत्री प्रदेश समन्वयक भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश यांनी केले.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ पंकज भिवटे विदर्भ संयोजक, डेंटल विंग भाजपा वैद्यकीय आघाडी, डॉ आकाश बाजड वाशीम जिल्हा संयोजक, डॉ ऋतुराज सांगळे बुलढाणा जिल्हा संयोजक, भाजपा तालुकाध्यक्ष गजानन देशमुख, भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस धारसिंग चव्हाण, पं.स. सदस्य दत्ताराव कागंने, सरपंच पंढरीनाथ कांगने, मा सरपंच प्रदीप चाटे, सुभाष कांगणे आदी उपस्थित होते. महाआरोग्य शिबिराचे आयोजन डॉ ज्ञानेश्वर कांगने यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव कांगने यांनी केले.
विनोद वाघ यांनी आपल्या भाषणामध्ये 60 वर्ष पासून रखडलेल्या रस्त्याचा प्रश्न मी मार्गी लावेल ही ग्वाही दिली. अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ उज्वलाताई दहिफळे यांनी निरोगी आरोग्यासाठी मार्गदर्शन केले त्यासोबतच गरीब गरजूंना मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रोत्साहीत केले.
डॉ पंकज भिवटे यांनी प्रदेश संयोजक यांनी डॉ अजित गोपछडे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या सेवा कार्याची व आरोग्य शिबीराची माहिती दिली.
समारोपाच्या भाषणात डॉ स्वप्नील मंत्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आरोग्य क्षेत्रासाठी सुरू केलेल्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती देऊन त्याचा सर्वसामान्यांनी लाभ घेण्याचे आवाहन करून भाजपा वैद्यकीय आघाडीच्या वतीने सुरू असलेल्या सेवा व समर्पण अभियानची माहिती दिली. त्यासोबतच कोरोनाच्या तिसऱ्या लाट येण्यापूर्वी काय काय काळजी घ्यावी ह्याची माहिती दिली. आभार प्रदर्शन डॉ ज्ञानेश्वर कांगणे यांनी केले व सर्व प्रमुख उपस्थितांचे आभार मानले.

माननीय श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदवसानिमित्त दहिफळे मेट्रो फीनिक्स हॉस्पिटल,संभाजीनगर यांच्या वतीने व मा.श्री डॉ.अजित गोपछेडे वैद्यकीय आघाडी प्रदेश अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात मोफत आरोग्य तपासणी शिबिर

भारतीय जनता पार्टी संभाजीनगर शहर / ग्रामीण शहर जिल्हा वैद्यकीय आघाडी सेवा व समर्पण अभियान अंतर्गत भारताचे लाडके पंतप्रधान माननीय श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदवसानिमित्त दहिफळे मेट्रो फीनिक्स हॉस्पिटल,संभाजीनगर यांच्या वतीने व मा.श्री डॉ.अजित गोपछेडे वैद्यकीय आघाडी प्रदेश अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.. विशेष या शिबिराला केंद्रीय अर्थराज्य मंत्री मा ना.श्री डॉ. भागवत कराड साहेब यांनी दिल्लीतून शुभेच्छा दिल्या या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रीय सचिव मा.सौ.विजयाताई रहाटकर यांच्या हस्ते करण्यात आले . या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मा.सौ.विजयाताई रहाटकर यांनी केंद्राच्या विविध योजना ची माहिती व विशेष म्हणजे आरोग्य दायी आयुष्मान भारत योजनेबद्दल रुग्णांना सविस्तर मार्गदर्शन केले. या शिबिराचे अध्यक्ष स्थानी भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष मा.श्री संजय केनेकर होते त्यांनी या शिबिराच्या आयोजकांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना दिलासा देणारी ही मोठी सेवा घडत आहे म्हणून त्यांनी आयोजकांचे मनापासून कौतुक केले व पुढे ही आधीच सेवा घडत राहण्या साठी शुभेच्छा दिल्या तसेच या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून मा.आ. श्री हरिभाऊ बागडे नाना माजी विधानसभा अध्यक्ष मा.आ.श्री अतुल सावे प्रदेश सरचिटणीस मा.श्री शिरीष बोराळकर प्रदेश प्रवक्ते मा.श्री.बसवराज मंगरुळे प्रदेश उपाध्यक्ष मा.श्री प्रवीण घुगे प्रदेश सचिव मा.श्री.भगवान बापू घडामोडे प्रदेश सरचिटणीस,ओबीसी मोर्चा मा.श्री.मनोज पांगारकर प्रदेश कार्यकारणी सदस्य मा.श्री.राजेश मेहता शहर जिल्हा संघटन सरचिटणीस मा.श्री राजू शिंदे शहर जिल्हा सरचिटणीस मा.श्री समीर राजूरकर शहर जिल्हा सरचिटणीस मा.श्री शिवाजी दांडगे शहर जिल्हा सरचिटणीस तसेच या शिबिराचे आयोजक मा.डॉ.उज्वला दहिफळे प्रदेश समन्वयक राष्ट्रीय स्वास्थ स्वयंसेवक अभियान महाराष्ट्र प्रदेश. संयोजिका..भाजपा भटक्या विमुक्त महिला आघाडी मराठवाडा यांनी या शिबिराची माहिती व महत्त्व आपल्या प्रस्तावनेतून केली. या शिबिराचे सूत्र संचालन मा.डॉ.रुपाली धर्माधिकारी डेंटल विंग समन्वयक संभाजीनगर यांनी केले. व मा.डॉ.श्री महेश मोहरीर यांनी मनपूर्वक आभार मानले या शिबिरात तपासणी साठी मोठ्या संख्येने गरजू रुग्णांनी गर्दी केली होती सर्वांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेले आरोग्य शिबिर यशस्वी संपन्न झाले असेच आपले सहकार्य मिळत राहो हीच अपेक्षा धन्यवाद आपली डॉ.उज्वला दहिफळे

National Health Volunteer Campaign भाजपा की ओर से औरंगाबाद मे भाजपा की ओर से औरंगाबाद में कल स्वास्थ्य स्वयंसेवक अभियान – राज्य समन्वयक डॉ. उज्जवला दहिफले की जानकारी 

औरंगाबाद. कोरोना महामारी (Corona Pandemic) को लेकर देश भर में निर्माण गहरे संकट से जनता को तत्काल प्राथमिक उपचार कराने हेतु  भारतीय जनता पार्टी (Bharatiya Janata Party) की ओर से संपूर्ण देश भर में राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक अभियान (National Health Volunteer Campaign) शुरु किया गया है।

महाराष्ट्र में 5 अगस्त से यह अभियान आरंभ हुआ है। इस अभियान के माध्यम से भाजपा कार्यकर्ता राज्य के 44 हजार से अधिक देहातों तक पहुंचकर कोरोना महामारी को रोकने और
स्वास्थ्य, सफाई, जागृति काम में अपना योगदान देंगे। कल शनिवार को औरंगाबाद में स्वास्थ्य स्वंयसेवक अभियान का आयोजन किया गया है। यह जानकारी भाजपा के राष्ट्रीय स्वास्थ्य

स्वयंसेवक अभियान की प्रदेश समन्वयक डॉ. उज्जवला दहिफले, भाजपा चिकित्सा आघाडी की अध्यक्ष डॉ. अजीत गोपछडे, पार्टी के शहराध्यक्ष संजय केणेकर ने आयोजित प्रेस वार्ता में
दी

औरंगाबाद शहर के सभी स्वयंसेवकों की कार्यशाला शहर के आयएमए हॉल में शनिवार को आयोजित की गई है। पिछले वर्ष भाजपा की ओर से कोरोना महामारी के रोकथाम के लिए
सेवा संगठन अभियान का आयोजन किया गया था। उसी तर्ज पर कोरोना की तीसरी लहर में उससे संक्रमित होने वाले हर मरीज को तत्काल स्वास्थ्य सेवा मिले, इस बात को सामने
रखकर भाजपा की ओर से देश भर में स्वास्थ्य स्वयंसेवक अभियान का आयोजन किए जाने की जानकारी डॉ. उज्जवला दहिफले ने दी। उन्होंने कहा कि सत्ता यह ध्येय नहीं है। जनता की
सेवा के लिए हम राजनीति में है। इस भूमिका से यह अभियान शुरु किया गया है।

भाजपा के स्वास्थ्य स्वंयसेवक देहातों में जाकर कोरोना महामारी और संपूर्ण स्वास्थ्य सफाई के बारे में जनजागृति निर्माण करेंगे। इस अभियान में जिला स्तर पर स्वयंसेवकों का गुट
तैयार किया गया है। कोरोना के प्राथमिक लक्षण दिखाए देने पर मरीज पर तत्काल इलाज करने का काम स्वयंसेवक करेंगे। हर स्वयंसेवक के पास हेल्थ कीट होगी। उसमें थर्मामीटर,
पल्स ऑक्सिमीटर, रैपिड एंटिजन टेस्ट साहित्य के अलावा प्रतिकार शक्ति बढानेवाली औषधियां शामिल रहेंगी।

तीसरी लहर में तत्काल इलाज के लिए अभियान का आयोजन

भाजपा शहराध्यक्ष संजय केणेकर ने कहा कि कोरोना की प्रथम और दूसरी लहर में इस महामारी को लेकर लोगों के मन में कई शंकाएं थी। लोग कोरोना मरीज के निकट जाने से घबराते
थे। जिससे ग्रामीण क्षेत्रों में कोरोना संक्रमित मरीजों पर तत्काल प्राथमिक उपचार मिलने में कई दिक्कते आयी। देश के पीएम नरेंद्र मोदी ने यह जान चुके है कि महामारी के प्रथम और
दूसरे चरण में लोगों को जरुरी स्वास्थ्य सेवाएं देने में कई कमियां रही हैं। महामारी के तीसरी लहर में नागरिकों को स्वास्थ्य सेवाएं मिलने में दिक्कते ना हो, इस बात को सामने रखकर
स्वास्थ्य स्वयंसेवक अभियान का आयोजन किए जाने की जानकारी संजय केणेकर ने दी।

भटके व विमुक्त महिला आघाडी मराठवाडा

योग दिवस

भारतीय प्राचीन संस्कृती परंपरा यामध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. आताच्या घडीला संपूर्ण जगावर कोरोणाचे सावट असताना योग दिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिवस हा दरवर्षी 21 जून रोजी जग भरात साजरा केला जातो.
या निमित्ताने केसापूरी तांडा तालुका दौलताबाद, जिल्हा संभाजीनगर येथे भटके व विमुक्त महिला आघाडी मराठवाडा, संयोजिका डॉ. उज्ज्वला दहीफळे यांच्या तर्फे योग शिबिर तसेच मानसिक व शारीरिक आरोग्य, सकस आहार या विषयी मार्गदर्शन करण्यात आले प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच करावा असे आवाहन करण्यात आले त्याचबरोबर मास्क, सॅनिटाईझर, साबण यांचे वाटप करण्यात आले. स्वतः डॉक्टर असल्यामुळे महिला रुग्णांची आरोग्य तपासणी सुद्धा करण्यात आली.
फक्त एकच दिवस नाहीतर रोजच्या दैनंदिन जीवनात मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी योगा, ध्यान आणि व्यायाम गरजेचा आहे.

आय एम ए औरंगाबाद, भारतीय योग संस्थान आणि असोसिएशन ऑफ चाइल्ड अँड अडोलेसंट केअर इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण

अध्यक्ष डॉ संतोष रांजलकर, सचिव डॉ यशवंत गाडे, उपाध्यक्ष डॉ अनुपम टाकळकर, उपाध्यक्ष डॉ उज्वला दहिफळे, ए सी सी आय इंडिया चे अध्यक्ष डॉ दत्ता कदम यांच्या पुढाकाराने साजरा झाला आंतरराष्ट्रीय योग दिन

Blood donation during Covid-19 Pandemic
At Dahiphale Hospital

Cleft Lip & Palate free surgery by Dahiphale Hospital

Blood Donation Camp At Dahiphale Hospital